श्री जगन्नाथाच्या धार्मिक निति तीन प्रकारचे आहेत दैनिक, प्रासंगिक आणि उत्सव. श्रीजगन्नाथ मंदिरात याना "नीती" असे म्हणतात. दररोज पाळल्या जाणाऱ्या निती दैनिक नित्यक्रम आहे. मंदिरात दररोज साजऱ्या होणाऱ्या विविध निती सकाळी ४:३० वाजता सुरू होतात आणि रात्री उशिरा पर्यंत चालू राहतात. श्री जगन्नाथाची खालील सर्व निति हे श्री जगन्नाथ मंदिर पूरी धाम ओड़िशा प्रमाणे मंत्र विधिपूर्ण केल्या जातात.
सकाळी ४:३० वा.:- द्वारपीठा निति - द्वारे उघड़ने, गर्भगृहाचे कलाहट द्वार उघड़ने निति
सकाळी ५:०० वा.:- धो-पखाल निति - मंदिर धुनें, साफ सफाई निति
सकाळी ५:३० वा.:- मंगला आरती निति - शुभ दिप, कर्पूर, बत्ती, पीठा आरती अर्पण निति
सकाळी ६:०० वा.:- मैलम निति - देवाचे वस्र, कपडे, फूले, हारे काढ़ने निति
सकाळी ६:३० वा :- अवकाश निति - पीतल आरशात देवाचे दन्त, गुळना, तसेच कपूर, दही, आवला, चन्दन, फुले मिसळून देवाचे स्नान निति
सकाळी ७:०० वा :- भेशालागि निति - देवाला नविन कपडे , फूल हार, श्रृंगार घातल्या जाते निति
सकाळी ७:३० वा :- सूर्य, द्वारपाल निति - सूर्य पूजा व् द्वारपाल पूजा करण्यात येते निति
सकाळी ८:०० वा :- रोषा होम निति - रोषाघरमधे अग्नि यज्ञ, देवाचा भोग शिजवण्यात येते निति
सकाळी ८:३० वा :- गोपाळ वल्लभ भोग निति - देवालापंच उपचार विधि द्वारे भोग दिल्या जातो निति
सकाळी ९ ते १० वा :- सकळ धुप निति – देवाला पंच उपचार विधि द्वारे राजभोग दिल्या जातो निति
सकाळी ११:३० वा :- भोग मंडपनिति - देवाला पंच उपचार विधि द्वारेभोग मंडपभोग दिल्या जातो निति
दुपारी ३:०० वा :- मध्यान्न धुप निति – देवालाषोडशो पचार विधि द्वारे आरती, भोग दिल्या जातो निति
दुपारी ५:०० वा. :-धो-पखालनिति - मंदिर धुनें, साफ सफाई निति
संध्याकाळी ६:०० वा :- संध्या आरतीनिति - दिप, कर्पूर आरती अर्पण करने निति
संध्याकाळी ७:००वा :- संध्या धुप निति - कर्पूर आरती, बत्ती आरती, जय मंगळ आरती, पंच उपचार विधि द्वारेभोग दिल्या जातो निति
रात्रि ८ ते ९वा :- बड़ सिंगार भेषा - बड़ सिंगार भेषा
रात्रि ९ ते ११वा:- धुप निति, ठाकुर शयन - बड़ सिंगार धुप निति, खाट सेजा लगी, पहूडा, गीत गोविन्द, शयन निति
दैनंदिन निति व्यतिरिक्त काही विशिष्ट दिवस आणि प्रसंगीक निति केले जातात.
प्रत्येक एकादशीला म्हणजेच दोन्ही पंधरवड्यांच्या अकराव्या दिवशी, देवतांच्या संपूर्ण शरीरावर चंदनाचा लेप लावला जातो, ज्याला 'सर्बांग चंदन लागली' म्हणतात. मदनमोहन रत्न सिंहासनात 'अज्ञमाला' स्वीकारतात आणि पालखीतून मंदिराच्या प्रांगणात प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर जय विजय दारावर 'आलाटी', 'बंदपाना' आणि 'भोग' केला जातो. प्रत्येक एकादशीच्या रात्री 'महादीपाआळती' (महान दीप अर्पण) केली जाते. संध्याकाळच्या धूपानंतर, पूजापांड प्रथम रत्नसिंहस्थानाजवळ 'महादीपाआळती' करतात, नंतर त्याला प्रदक्षिणा घालतात आणि नंतर जय विजय दरवाजा ओलांडून विमला मंदिराच्यासमोर 'कलसा' (मातीच्याभांड्यात) महादीप घेऊन जातात.ते 'चुनार' सेवकांनातीन कलश आणि काहीतुळशी आणि चंदन प्रसाद देतात. तीन चुनार सेवक महादीपांसह मंदिरावर चढतात, 'दधीनौती' खालीउभेराहून, ते नीलचक्रांना तुळशी आणि चंदन अर्पण करतात आणि नंतर महादीपा आणिचंद्र उडियासह तीन वेळा प्रदक्षिणा घालतात व निल चक्रवर ध्वजा बद्लावतात.
जर अमावास्या प्रति पदेपर्यंत (पंधरवड्याच्या पहिल्या दिवशी) असेल, तर हा विधी सकाळच्या धूपानंतर केलाजातो. महाजन सेवक 'दक्षिणा घर' मधून श्रीनारायणाची धातूचीप्रतिमा आणतात आणि रत्नसिंहस्थानावर ठेवतात. पूजापांड देवाला श्रीजगन्नाथाकडून 'अज्ञमाला' देतात. त्यानंतर चांदीच्या भांड्यात पाणी आणतो आणि ते पूजापांडाला देतो, नंतर पूजापांड तेपवित्र करतो आणि देवाला अर्पण करतो. पूजा पांडाकडून पाणाभोग, आळती, बंदपान देखील केलेजाते. त्यानंतर देवाला यमेश्वर महादेव मंदिरात नेल्यानंतर, तेथे शीतला भोग आणि बंदपान केलेजाते. त्यानंतर देव परत येतो आणि त्याच्या 'दक्षिणाघरात' परत जातो.
माजना आणि एकांत विधी साधारणपणे दर गुरुवारी पहाटेच्या धुपानंतर केले जातील. सेवकांद्वारे केले जाणारे मजाना,चंदनलागी, भोग, आलाटी, बंदापना इत्यादी काही विशेष संस्कार.
गुरुवारी रात्रीच्या वेळी हे केले जाते. संध्याकाळच्या धूपानंतर, महाजन सेवक मदनमोहनला 'दक्षिणाघर' वरून रत्नसिंहस्थानात घेऊन जातात. त्यानंतर पूजापांड श्रीजगन्नाथाकडून मदनमोहनलाएक 'अज्ञामाला' आणि श्रीदेवी (लक्ष्मी) ला दुसरीसाधी अजनामाला अर्पण करतात. त्यानंतर सेवक देवतांना लक्ष्मी मंदिराच्या जगमोहनात घेऊन जातात आणि तेथे खाटेवर देवतांना ठेवतात. पूजा नंतर आळती होते आणि त्यानंतर 'बंदपान' (विधीनुसार पूजाकिंवाअभिवादन) केले जाते.
चंद्र आणि सूर्यग्रहणाच्यावेळी देवतांसाठी कोणतेही निति केले जात नाहीत मंदिर बंद राहतो. 'पकत्याग' (स्वयंपाकाच्या क्रियाथांबवणे) नंतर 'महास्नान', शीतला भोग (खाई, कोरा इत्यादी) सारखे इतर विशेष विधी केले जातात आणि देवतांना अर्पण केलेजातात.
जर कुत्रा मंदिरात शिरला किंवा मंदिराच्या परिसरात मृतदेह किंवाहाड आढळलेतर देवतांचे निति स्थगित केले जातात आणि देवतांचे 'महास्नान' केले जाते.
हाविधी दर बुधवारी किंवा गुरुवारी केला जातो. सेवक 'बनक' दळल्या नंतर ते सिंहासनावर चढतात आणि "बनकलागी" (प्रतिमारंगवणे) सुरू करतात. मधल्या 'बड' पर्यंत ही सेवाकरताना, पालियामेकाप अखंडातून बैठ (दीप) घेऊन जातानादाखवतात. 'बनकलागी' संपल्यानंतर सिंहासनावरून खाली उतरतात.
Awar – Wadi Rd, Isapur,
Wadi-Adampur
Dist:- Akola,
Maharashtra - 444108
Tel. No. 8551032529