• Since 1988

श्रीगुंडीच्या मंदिर

श्रीगुंडीच्या मंदिर हे जगन्नाथाच्या मुख्य मंदिरापासून सुमारे ३ किमी अंतरावर वाड़ी अदमपुर येथे स्तिथ आहे, ज्याला श्रीगुंडीच्या मंदिर म्हणून ओळखले जाते ज्याच्या सर्व बाजूंना भिंती आहेत. गुंडीच्या मंदिराचे नाव इंद्रद्युम्नाची राणी गुंडीच्या हिच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. गुंडीच्या मंदिर हे एका विशिष्ट कलिंग मंदिराचे उदाहरण आहे आणि ते देऊळ शैलीतील बांधले गेले आहे. मंदिर संकुलात ४ घटक आहेत. विमान गर्भगृह असलेले बुरुज, जगमोहन, नाट मंडप, आणि भोग मंडप. एका लहान स्वयंपाकघर जोडलेले आहे. गुंडीच्या मंदिरात वर्षभर कोणताही कार्यक्रम होत नाही, फक्त नऊ दिवसांचा रथयात्रा असतो, जेव्हा भगवान जगन्नाथाची पूजा केली जाते.

गुंडीच्या मार्जन

जगन्नाथ पुरीमधील जगप्रसिद्ध रथयात्रेच्या एक दिवस आधी गुंडीच्या मार्जन साजरा केला जातो. गुंडीच्या मार्जन म्हणजे भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांचे स्वागत करण्यासाठी गुंडीच्या मंदिराची स्वच्छता. श्री चैतन्य महाप्रभू स्वतः अनेक भक्तांसह गुंडीच्या मंदिर स्वच्छ करायचे. ते एक आदर्श ठेवण्यासाठी आणि इतरांना सूचना देण्यासाठी हे करायचे. गुंडीच्या मंदिर स्वच्छ करताना, भगवान चैतन्य महाप्रभू अश्रू ढाळायचे आणि कधीकधी ते त्या अश्रूंनी स्वच्छ करत राहायचे. श्री चैतन्य महाप्रभू सर्व पेंढा, धूळ गोळा करून ते त्यांच्या कपड्यात भरायचे आणि मंदिराच्या बाहेर फेकून द्यायचे. मंदिर स्वच्छ करणारे इतर सर्व भक्त त्यांचे अनुसरण करायचे.

रथ यात्रा उत्सव

रथयात्रा हा सर्वात प्रसिद्ध आणिव्यापक उत्सव आहे.रथयात्रा प्रसिद्ध उत्सव आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. श्रीबलभद्र, देवीसुभद्रा, श्रीजगन्नाथ आणि श्रीसुदर्शन या देवतांना रथांमध्ये बसवले जाते आणि सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या गुंडीच्या मंदिरात वाड़ी अदमपुर येथे नेले जाते, जिथे देवता १० दिवस राहतात. त्यानंतर परत रथयात्रा बहूदायात्रा, होऊन श्रीबलभद्र, देवीसुभद्रा, श्रीजगन्नाथ आणि श्रीसुदर्शन या देवतांना रथांमध्ये बसवले जाते आणि श्रीजगन्नाथ मंदिरात ईसापुर येथे परत नेलेजाते.रथयात्राकाळात हेरापंचमी विधी, संध्या दर्शन, सुनाबेसा, अधारपण भोग, नीलाद्री बीजे विधी केले जातात.

हेरा पंचमी

रथयात्रे दरम्यान गुंडीच्या मंदिरात साजरा केला जाणारा मुख्य विधी रथयात्रेच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो, ज्याला हेरा पंचमी म्हणतात. भगवान जगन्नाथ गुंडीचा मंदिरात जातात, तर त्यांची पत्नी लक्ष्मी मुख्य मंदिरात मागे राहते. हेरा पंचमीच्या दिवशी, सुवर्णा महालक्ष्मीच्या रूपात क्रोधित देवी लक्ष्मी गुंडीचा मंदिरात येते. तिला पालखीत बसवून पूजा केली जाते आणि गुंडीच्या मंदिरातील पुजारी तिची पूजा करतात, जे तिला भगवान जगन्नाथांना भेटण्यासाठी गर्भगृहात घेऊन जातात. गुंडीच्या मंदिराच्या गर्भगृहात या जोडप्याला समोरासमोर बसवले जाते.लक्ष्मी देवाला घरी परतण्याची विनंती करते आणि देव तिला अज्ञान माळ अर्पण करून त्यांची संमती देतो, जी ती स्वीकारते आणि संध्याकाळी मुख्य मंदिराकडे निघते. निघताना, तिचा राग व्यक्त करण्यासाठी लक्ष्मी तिच्या एका सेवकाला भगवान जगन्नाथांच्या रथाचा एक भाग रथभंग करण्याचा आदेश देते.

गुंडीच्या मंदिर संध्या दर्शन

दक्षिणेकडे वळण्याचा विधी रथयात्रेच्या सहाव्या दिवशीम्हणजे हेरा पंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. बहुदा यात्रेसाठी रथ मंदिराबाहेर पश्चिमेकडील प्रवेशद्वाराकडे तोंड करून उभे केले जातात.

दक्षिण मोडा

पुराणांमध्ये वर्णन केल्या प्रमाणे संध्याकाळी गुंडीच्या मंदिर आडप मंडपावर चार देवतांचे दर्शन घेतल्याने भक्ताला अखंड आनंद मिळतो. 'नीलाद्रीमहोदय' मध्येवर्णन केल्याप्रमाणे श्रीजगन्नाथ मंदिर येथे १० वर्षे सतत देवतांचे दर्शन केल्याने गुंडीच्या मंदिरातील आडप मंडपात फक्त एका दिवसासाठी देवतांचे दर्शन घेतल्या सारखेच आहे. विशेषत जर एखाद्याने गुंडीच्या मंदिर संध्याकाळी रात्रीच्या वेळी देवतांचे दर्शन घेतलेतर त्याला अपेक्षित फळां पेक्षा दहापट जास्त फळमिळते. प्राचीन काळापासून संध्यादर्शन विधी बहुदायात्रेच्या आदल्या दिवशी केला जातो.