श्री जगन्नाथ धाम हे चार धामापैकी एक धाम आहे. श्री जगन्नाथ धाम हे पूरी मधे स्तिथ आहे व श्री जगन्नाथ तिथे नित्य निवास करतात. श्री जगन्नाथ हे सर्व जगाचे नाथ आहेत. भगवान श्री जगन्नाथ सर्वव्यापी परमात्मा आहेत आणि सर्व आत्म्याचे सर्वांचे उगमस्थान आहेत.
श्री जगन्नाथ मंदिर, ईसापुर ची निर्मिती ईसापुर ह्या छोट्याश्या गावी २०२२ मधे भक्त गोपाल यांच्या स्वप्न साक्षात्कारातून झाली. श्री जगन्नाथ दारुब्रम्ह विग्रह मंदिरातच १४ दिवसात, ब्रम्ह मुहूर्तात, विशिस्ट मन्त्रोपचारात प्रगट झाले. निमित्यमात्र भक्त गोपाल व एकनाथ सुतार विश्वकर्मा यांचेद्वारे श्री चतुर्धा मुर्तीचे रूप प्रगट झाले, म्हणून श्री जगन्नाथ मंदिर, ईसापुर येथील श्री जगन्नाथ बलभद्र सुभद्रा सुदर्शन चे विग्रह कुठूनही आणले नाहीत, ते चतुर्धा मुर्तीचे रूप तिथेच प्रगट झाले आहेत.
तसेच श्री जगन्नाथ मंदिर, ईसापुर ची प्राणप्रतिष्ठा व स्थापना दिनांक १ जुलाई २०२२ रोजी भव्य यज्ञ व मन्त्रोपचारासाह श्री जगन्नाथ पुरीतील ११ ब्राम्हण व ऋषि द्वारा करण्यात आले. यामधे ईसापुर, वाड़ी अदमपुर, तेल्हारा, अकोला, विदर्भ, महाराष्ट्रतील व दूर क्षेत्रातील सर्व भावीक भक्तानी तन मन धनाने सहभाग घेतला व अनन्यभावाने सेवा अन पूजा केली.[cite: 1]
सम्पूर्ण विदर्भ, महाराष्ट्रभरातून व दुर-दुरुन श्री जगन्नाथ मंदिर, ईसापुर येथे दररोज शेकडो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. तसेच, जे लोक चार धामाला जाऊ शकत नाहीत ते सर्व श्री जगन्नाथ धाम ईसापुर येथेच येऊन श्री जगन्नाथ धामाच्या दर्शनाचा लाभ प्राप्त करतात.
तसेच दरवर्षी आषाढ शुक्ल तिथीच्या दुसऱ्या दिवशी भव्य रथयात्रा महामहोत्सव साजरा केला जातो व सम्पूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रभरातून लोखो भाविक भक्त रथ यात्रेचा, रथ ओढण्याचा व श्री जगनाथ दर्शनाचा लाभ घेतात.
Awar – Wadi Rd, Isapur,
Wadi-Adampur
Dist:- Akola,
Maharashtra - 444108
Tel. No. 8551032529